तुम्ही काय गमावले आहे, याचा शोध तुम्हीच लावा : विजय औटी

कार्यकर्त्यानी खचून जाण्याचे कारण नाही. विकासकामांसाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.
vijay auti appeals to parner voters 
vijay auti appeals to parner voters 

टाकळी ढोकेश्वर (पारनेर- नगर) : विरोधात असतानाही मोठ्या प्रमाणावर विकासकामे करून मतदारसंघाचा चेहरा बदलला. तुम्ही काय गमावले आहे, याचा शोध तुम्हीच लावा. कार्यकर्त्यानी खचून जाण्याचे कारण नाही. विकासकामांसाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मी अजून मैदान सोडलेले नाही, असा विश्वास विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी कार्यकर्त्यांना दिला.

अळकुटी (ता. पारनेर) येथील महादेव मंदिर सभामंडपाच्या उदघाटन औटी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कृषी व बांधकाम सभापती काशिनाथ दाते, पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके आदी या वेळी उपस्थित होते.

औटी म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मी समाधानी आहे. मुख्यमंत्री म्हणुन ते चांगले काम करत आहेत. सभापती दाते व शेळके यांनी जास्तीत विकास कामे करुन कार्यकर्त्याना पाठबळ दयावे. 

दाते म्हणाले, पदाच्या माध्यमातून मी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. औटी यांच्या माध्यमातून विकासकामे सुरूच राहतील. माझ्या पदाचा वापर मी जनतेच्या कामासाठीच करेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com